
माझ्या प्रिय दीक्षा, आश्रय घेतलेल्या, दीक्षा इच्छुक, शिक्षा-शिष्य , नात-शिष्य आणि हितचिंतकांनो,
माझ्या शिष्याना आशीर्वाद, शुभेच्छा आणि बंधूना आणि वडीलधाऱ्यांनी प्रणाम स्वीकारावा .
जय श्रील प्रभुपाद
माझ्या निवासस्थान श्री मायापूर चंद्रोदय मंदिर वरून लिहिलेले:.
दिनांक: २९ मार्च २०२६
सहसा, मी प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला संदेश पाठवतो, परंतु आज माझे शिष्य व्यास-पूजा उत्सव साजरा करत असल्यामुळे, मला आज या कामदा एकादशीला पाक्षिक संदेश पाठवायचा आहे.
श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांना अर्पण केलेल्या आपल्या एका व्यास-पूजेत , श्रील प्रभुपाद उल्लेख करतात की , कृष्ण हे प्रत्येकाचे आध्यात्मिक गुरु आहेत, परंतु ते आपल्या अनंतरूपांद्वारे, म्हणजेच आध्यात्मिक गुरु म्हणून कार्य करणाऱ्या आपल्या भक्तांच्या माध्यमातून कार्य करत असतात. प्रत्येक गुरूंना एक आध्यात्मिक गुरु असतो. म्हणून, व्यास-पूजा करणे म्हणजेच वास्तविकतः आपण संपूर्ण गुरु-परंपरेची पूजा करणे होय . आणि आध्यात्मिक गुरूं जो काही सन्मान स्विकारतात , तॊ ते गुरु-परंपरेला अर्पण करतात. ते तो स्वतःसाठी स्वीकारत नाहीत.
मी १९ वर्षांचा असताना कृष्णभावनामृताच्या आंदोलनात सामील झालो, आणि श्रील प्रभुपादांनी माझ्यावर कृपा केली व मला आपला शिष्य म्हणून स्वीकारले व वयाच्या २१ व्या वर्षी मला संन्यासाची दीक्षा दिली. त्यांनी मला जयपताका हे नाव दिले, ज्याचा अर्थ विजयाचा ध्वज असा होतो, आणि त्यांनी मला अनेक निर्देशही दिले. मी जे काही करू शकलो आहे, ते केवळ श्रील प्रभुपादांच्या कृपेमुळेच आहे. परंतु अनेक बाबतीत, मला असे वाटते की प्रभुपादांना अपेक्षित होते तितके यश मला मिळालेले नाही.
श्रील प्रभुपादांच्या आज्ञेनुसार, मी वयाच्या २९ व्या वर्षी दीक्षा देण्यास सुरुवात केली. दीक्षेच्या वेळी, शिष्य किमान १६ माळा नामस्मरण करण्याची आणि चार नियमांचे पालन करण्याची शपथ घेतो, आणि त्याच वेळी, गुरुदेखील भगवंतासमोर शपथ घेतात की ते या आत्म्याला भगवंताकडे परत घेऊन जातील. म्हणून, केवळ इतक्या शिष्यांना दीक्षा देणेच नव्हे, तर त्यांची काळजी घेणे ही माझी जबाबदारी आहे; माझे सर्व शिष्य भगवंताकडे परत जातील हे मला पाहावे लागेल. दीक्षाविधी सोपा आहे, पण ती एक आयुष्यभराची वचनबद्धता आहे. म्हणून मला तुमच्याकडून मदतीची अपेक्षा आहे, तुम्ही तुमची भक्ती अत्यंत अप्रतिमरित्या करावी . तुम्ही सर्वांनी रती अवस्थेपर्यंत प्रगती करावी अशी माझी इच्छा आहे, आणि मला आशा आहे की तुमच्यापैकी काही जण कृष्ण-प्रेम प्राप्त करतील. प्रत्येक भक्ताने हरे कृष्ण मंत्राचा जाप आणि चार नियमांचे पालन करण्यात अत्यंत कठोर असावे आणि भगवंताकडे परत जावे, अशी आमची इच्छा आहे.
मध्यंतरी मी हरे कृष्ण महामंत्राचे गुणगान करणारे अनेक श्लोक वाचत होतो. त्या श्लोकानुसर, जसे आपण गायत्री मंत्र, सकाळी, दुपारी आणि रात्री तीन प्रहरी करतो , त्याच प्रमाणे प्रत्येक प्रहरी एक , याप्रमाणे तीन माळा कराव्यात. माझी सर्व भक्तांना, ज्यांनी हरिनामाची दीक्षा घेतली आहे, त्यांना अशी विनंती आहे की, जोपर्यंत त्यांना गायत्री मंत्रा मिळत नाही, तोपर्यंत त्यांनी तीन प्रहरी (हरे कृष्ण महामंत्राच्या) तीन माळा कराव्या .
“एकदा, दोनदा, तीनदा, कुवतीनुसार किंवा आयुष्यभर – जो कोणी नामजप करतो, अगदी कुत्रा खाणारा चण्डाल सुद्धा, तो निःसंशयपणे माझा भक्त होतो.” (वायु पुराण, अध्याय १४, चंद्रासमान गौरांगाचा उदय, श्लोक ३८)
या मर्त्य जगतात , मनुष्याने आत्मसंयमाने आणि नियमांन मध्ये स्वतः ला अनुशासीत करून, दिवसातल्या तीन प्रहरी (पहाट, दुपार आणि संध्याकाळ) जप करावा. त्याला अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त होते; यात काही शंका नाही.” पद्म पुराण, भूमीखंड, अध्याय ८७, विष्णूची शंभर नावे, श्लोक २७
मी सतत, प्रत्येक क्षणी नामजप करत असतो. मी दिवसभरात विविध कामे करत असतो , पण ती कामे करत असताना, त्यासोबत मी नेहमी हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो. अगदी शौचालयात गेल्यावरही मी बोटांवर जप करतो. मी सतत जप करतो. १६ माळा जप करणे अवघड नाही. असे नाही की आपण फक्त बसून औपचारिकपणे जप करू शकतो, तर तुम्ही सतत जप करू शकता. आपण किमान १६ फेऱ्या जपल्या पाहिजेत. श्रील प्रभुपादांनी तें तर सांगितले आहेच. किंतु आपण सतत नामजप करायला हवा , नेहमी कृष्णाचे स्मरण करायला हवे .
तसेच माझी अशी इच्छा आहे की, माझ्या प्रत्येक शिष्याने अशी वचनबद्धता करावी, तो/ती वर्षात, महिन्यात किती नवीन लोकांना नामजप करायला लावेल आणि वर्षात आणखीन नवीन लोक भक्तीसेवेसाठी पूर्णपणे समर्पित होतील.
मी श्रील प्रभुपादांचा प्रचार आणि सेवा करण्यासाठी सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहे. आता, मी माझ्या खोलीत दोन स्मार्टबोर्ड बसवले आहेत. जेणे करून मला आठवड्यातून काही विशेष वर्ग घेता येतील . माझ्यावर अनेक वेगवेगळ्या विभागांची जबाबदारी आहे आणि माझे शिष्य जगभर आहेत. म्हणून मला वेगवेगळ्या वेळी वर्ग घ्यायचे असतात , जेणेकरून प्रत्येकजण आठवड्यातून किमान एका वर्गाला उपस्थित राहू शकेल. मी जे रोजचे वर्ग घेतो, ती वेळ जगाच्या पूर्वेकडील भागात राहणाऱ्या भक्तांसाठी उशिराची असेल. त्यामुळे भक्तांना ते थेट प्रक्षेपण पाहता येणार नाही, ते नंतर माझ्या चॅनलवरून पाहू शकतील. आणि अशा प्रकारे अधिक भक्त माझ्या वर्गांद्वारे माझ्याशी जोडले जाऊ शकतील.
श्रील प्रभुपाद म्हणायचे की, तुम्ही एकमेकांना किती चांगल्या प्रकारे सहकार्य करता, यातून तुमचे माझ्यावरील प्रेम दिसून येईल. म्हणून माझी इच्छा आहे की भक्तांनी स्वतंत्रपणे नव्हे, तर सहकार्याच्या भावनेने एकत्र काम करावे. जेव्हा कोणी चांगले काम करत असेल, तेव्हा आपण त्यांच्याकडून शिकून ते आपल्या सेवेत आचरणात आणले पाहिजे. आणि आमची इच्छा आहे की भक्तांनी इस्कॉनमध्ये राहावे, आणि जीबीसी, स्थानिक अधिकारी, मंदिर अध्यक्ष इत्यादींसोबत काम करावे.
आम्ही श्रील प्रभुपादांची विनंती पूर्ण करू इच्छितो. आम्ही श्रील प्रभुपादांच्या विनंतीसाठी आवश्यक ते कार्य गतिशीलपणे करू इच्छितो.
आशा आहे की तुम्ही सर्वजण उत्तम आरोग्यात आणि आनंदमय कृष्णभावनेत राहाल .
तुमचा सदैव हितचिंतक,
जयपताका स्वामी
जेपीएस/आरआरएसडीबी